
जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ठाणेकरांना महाराष्ट्राच्या लोककलेचे सुरेल दर्शन घडले. देवीचा गोंधळ, जागरण, लावणी, कोळी गीते, शेतकरी गीते असे लोककलेचे विविध प्रकार सादर करण्यात आले. ‘उधळू रंग स्वरांचे’ या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. या महोत्सवात भक्ती व कलेचा अनोखा संगम पहायला मिळाला.
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र पार पडला. रामनवमीचे औचित्य साधून किरण वेहले प्रस्तुत ‘उधळू रंग स्वरांचे’ हा कार्यक्रम यशस्वी ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या गीतांनी उपस्थितांच्या मनात चैतन्य निर्माण झाले. तसेच नृत्य नाटिकेच्या माध्यमातून स्वामी समर्थ महाराज आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात उदे गं अंबे उदे..
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, मनसेचे नेते अविनाश जाधव, रवींद्र मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, उपमहापौर कृष्णा पाटील, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी, आरटीओ अधिकारी हेमांगिनी पाटील यांनीही देवीची पूजा व आरती केली.

























































