
डिजिटल अरेस्ट स्पॅमसाठी वापरला जाणारा आयडी व्हॉट्सअॅप ब्लॉक करणार आहे. याशिवाय, स्काइपसारखे सुरक्षित फिचर्स लागू केले जातील. धोकादायक एपीके फाईल्स ओळखून त्याला ब्लॉक करण्यासाठी नवीन फिचर्ससुद्धा आणली जातील. गृह मंत्रालयाच्या एका समितीने व्हॉट्सअॅप कंपनीला हे निर्देश दिले आहेत. डिजिटल अरेस्टसारख्या घोटाळ्यांना रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपवर फिचर्स यायला हवीत, असे केंद्र सरकारला वाटत आहे.
व्हॉट्सअॅपनेसुद्धा यावर सहमती दर्शवली आहे. काही फिचर्सवर काम सुरू केले आहे. गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय आंतरविभागीय समितीची तिसरी बैठक या महिन्याच्या सुरुवातीला पार पडली. ज्यात या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे. यातील सर्वात पहिले फिचर म्हणजे डिजिटल अरेस्टच्या आरोपीच्या डिव्हाईसची ओळख पटवणे आणि त्यांची आयडी ब्लॉक करणे. दुसरे फिचर स्काइपसारखे प्रोटेक्टिव फिचर व्हॉट्सअॅपमध्ये लागू करणे, तिसरे फिचर डिलीट झालेल्या अकाऊंटच्या युजर डेटाला कमीत कमी 180 दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवणे, चौथे फिचर धोकादायक एपीके फाइलला ओळखून ब्लॉक करणे, पाचवे फिचर एआय आणि मशीन लर्निंग सिस्टमला आणखी मजबूत करणे यांसारखी फिचर व्हॉट्सअॅपने आणावीत, असे निर्देश केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या समितीने दिले आहेत.
डिव्हाईस आयडी म्हणजे कोणत्याही गॅझेटची ओळख असते. जो यूनिक नंबर असतो. हा नंबर आधार कार्डवरील नंबर सारखा असतो. डिव्हाइस आयडी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. ज्यात आयएमईआय नंबर, मॅक अॅड्रेस, डिव्हाइस सिरीयल नंबर सारखी असते. आयएमईआय नंबर मोबाइल नेटवर्कमध्ये फोनची ओळख करण्यासाठी असतो. मॅक अॅड्रेसचा वायफाय किंवा नेटवर्कच्या ओळखीसाठी वापर होते. डिजिटल अरेस्टमध्ये स्पॅमरने वापरलेला व्हॉट्सअॅप नंबर ओळखून तो ब्लॉक करणे महत्वाचे आहे.
























































