सेंट्रल बँकेला 296 कोटींची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेंट्रल बँक ऑफ इंडियाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 296.08 कोटी रुपयांची डिमांड नोटीस आयकर विभागाने पाठवली आहे. बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कमी टॅक्स पे केल्याचा आरोप करत आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आहे, असे बँकेने म्हटले आहे. आयकर विभागाने पाठवलेल्या नोटिसीला बँकेने सहमती दर्शविली नसून आयकर विभागाच्या या नोटिसीला आव्हान दिले जाईल.