
आगमनानंतर वेध लागतात गौरीच्या आगमनाचे ! शनिवारी (29 रोजी) गौरीचे आगमन होणार असून, तीन दिवसांच्या या सणानिमित्त घरोघरी तयारी करण्यात आली आहे. विविध साहित्याने बाजारपेठ फुलली आहे.
बाजारपेठांमध्ये गौरींचे मुखवटे, विविध प्रकारचे दागिने, साड्या आणि सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने महिलांची खरेदीसाठी गदीं बघायला मिळते आहे. विशेषतः गणेशोत्सवानंतर लगेच येणाऱ्या गौरी तथा महालक्ष्मींच्या सणासाठी घराघरात तयारी सुरू आहे. या वर्षी फायबर वस्तूंना जादा मागणी वाढली आहे.
गौरींचे मुखवटे, सुवर्ण रौप्य अलंकार, रंगीबेरंगी मण्यांचे हार, पायांतील तोडे, बांगड्या, मुकुट, कर्णफुले, नथ, काचकामाचे दागिने, गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे, बोरमाळ, मंगळसूत्र, कंबरपट्टे असे विविध प्रकारचे दागिने बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. देवीच्या आकर्षक पितळी, फायबर, मुखवट्यांना, फुलांच्या आरासेला आणि पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्यालाही चांगली मागणी आहे.
देवीची सजावट अधिक आकर्षक आणि भव्य दिसावी यासाठी पारंपरिक दागिन्यांसोबतच हलक्या वजनाच्या कृत्रिम दागिन्यांनाही मोठी पसंती मिळत आहे. काही भाविक सजावटीत पर्यावरणपूरक संकल्पना राबविताना दिसत आहे. त्यासाठी कागद, फुले आणि नैसर्गिक वस्तूंनी केलेली सजावट निवडली आहे.
गणपती आगमनाबरोबर शहरातील गल्लीबोळात महालक्ष्मी अलंकार विक्रीची दुकाने व स्टॉल्स गजबजले आहेत. या खरेदीमुळे बाजारपेठेत उत्साही वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे.
मुखवटे 700 रुपये ते पाच हजार रुपयांपर्यंत असून, त्यात पीओपी, फायबर, पितळी मुखवटे तीन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत असून, महालक्ष्मीपुढे वारकरी नाचतानाचा, संत ज्ञानेश्वर माउली रथ, झांज पथक, वासुदेव आदी प्रकारचे सेट 1500 रुपयांपर्यंत, मंडप दोन हजार ते पाच हजार रुपये, पायऱ्या तीन ते चार हजार रुपये, विविध प्रकारच्या लहान-मोठया समया, दिवे, निरंजनी यांनाही चांगली मागणी आहे. तसेच महालक्ष्मीसाठी लागणारी ज्वेलरी यालाही चांगली मागणी आहे.
धनंजय कानडे, मालक, धनंजय मेटल स्टील सेंटर