
विनोदी चित्रपट आवडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. प्रियदर्शनचा मालामाल विकली चा सिक्वेल आता कन्फर्म झाला आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेते परेश रावल यांनी या बातमीला दुजोरा दिलेला आहे. एका गावात घडणाऱ्या या चित्रपटाने त्याच्या साधेपणाने आणि उत्कृष्ट कॉमिक वेळेने प्रेक्षकांना भुरळ घातली. आता, जवळजवळ दोन दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे.
‘मालामाल वीकली २’ बद्दल निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु या चित्रपटातील मुख्य अभिनेते परेश रावल यांनी मात्र या बातमीला दुजोरा दिलेला आहे. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल विचारले असता ते म्हणाले, “हो, बातमी खरी आहे. मी हा चित्रपट करत आहे.” असे त्यांनी सांगितले.
मालामाल विकली या चित्रपटाची कथा एका लहानशा गावाभोवती गुंफलेली आहे. १ कोटी किमतीची लॉटरी जिंकल्यानंतर काय घडतं… त्यानंतर चित्रपटामध्ये कोणता टर्निंग पाॅईंट येतो. हे या चित्रपटात पाहायला मिळते. सध्याच्या घडीला परेश रावल यांच्याकडे फक्त मालामाल वीकली हाच एक सिनेमा नसून, “भागम भाग” च्या सिक्वेलसाठी देखील त्यांनी तयारी सुरु केली आहे.



























































