सकाळी रिकाम्या पोटी ताक पिण्याचे जबरदस्त फायदे; पचन, वजन आणि इम्युनिटीसाठी रामबाण उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्याला लाभदायक असे पेय म्हणजे ताक. तज्ज्ञांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास ताक पिल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. हे साधे दिसणारे पेय पचन सुधारण्यापासून ते वजन नियंत्रणापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. ताकामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे गॅस, अॅसिडिटी, अपचन आणि पोटफुगी यांसारख्या समस्या कमी होतात. विशेषतः जिरे आणि काळे मीठ घालून घेतल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो.

घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? मग करुन बघा हे साधे सोपे उपाय

ताक शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. उष्णतेमुळे होणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ताक अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि थकवा कमी होतो.

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ताक हा उत्तम पर्याय आहे. कमी कॅलरी आणि कमी फॅट असल्यामुळे ते पोट भरल्यासारखे वाटते आणि जास्त खाणे टाळण्यास मदत करते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Detox Water Benefits – डिटॉक्स वॉटर घेतल्याने शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या…

तसेच ताकामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ताकातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.

सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर ताक पिणे फायदेशीर ठरते. त्यात जिरे, कोथिंबीर किंवा काळे मीठ घालून घेतल्यास चव आणि फायदे दोन्ही वाढतात.

ताक आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी जास्त प्रमाणात सेवन टाळावे. काही विशिष्ट आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.