
जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती इनाह कॅनाबारो लुकास यांचे निधन झाले. मृत्यूवेळी त्यांचे वय 116 वर्षे 326 दिवस होते. त्या ब्राझीलमध्ये नन आणि जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांचा जन्म 8 जून 1908 रोजी रिओ ग्रांदे दो सुल येथे झाला होता. जपानच्या तोमिको इतोओका (वय 116) यांचे निधन झाल्यानंतर 4 जानेवारी 2025 पासून जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचा मान मिळाला होता. इनाह कॅनाबारो लुकास यांचा जन्म जोआओ अँटोनियो लुकास आणि मारियाना कॅनाबारो यांच्या पोटी झाला. त्या रागमफिन युद्धातील प्रसिद्ध नेते जनरल डेव्हिड कॅनाबारो यांच्या पणती होत्या.