
सरकारने नुकताच जन सुरक्षा कायदा संमत केला. या कायद्याची भीती नाही, पण ती राबवणाऱ्यांची भीती मात्र आहे असे सांगतानाच लोकशाही टिकवण्यासाठी न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले असे स्पष्ट प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी केले. जनसुरक्षा कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकार मिळतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.