
आपलं वय वाढत जातं तसे चेहऱ्यावरही बदल हे आपसुकपणे होतात. वाढत्या वयामुळे, पोषण तत्वांच्या अभावामुळे तसेच प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरुकुत्या पडू लागतात. परंतु काहीजणांमध्ये मात्र वय वाढण्याआधीच चेहऱ्यावर सुरुकुत्या दिसू लागतात. अशावेळा आपण कुठलीही रसायने असलेली मेकअप प्रोडक्ट वापरण्यापेक्षा, घरच्या घरी केलेले उपाय हमखास फायदेशीर ठरतात.
सुरकुत्या कमी करण्यासाठी रामबाण उपाय
कोरफड आणि व्हिटॅमिन ई
सुरकुत्या कमी करण्यासाठी 2 चमचे कोरफडीच्या जेलमध्ये 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा आणि मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. हे मिश्रण नियमितपणे लावल्याने सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा तरुण दिसण्यास मदत होईल.मुलतानी माती आणि गुलाबजल
सुरकुत्या कमी करण्यासाठी मुलतानी माती आणि गुलाबपाणी देखील लावता येते. मुलतानी माती चेहरा आतून स्वच्छ करते आणि त्वचेला चमक देते. 2 चमचे मुलतानी माती आणि 2 चमचे गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर 20 मिनिटे लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. अशा प्रकारे मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स देखील दूर होतात.
Skin Care- त्वचा उजळण्यासाठी मोहरीचे तेल आहे गुणकारी, वाचा सविस्तर
केळी आणि मध
सुरकुत्या कमी करण्यासाठी केळी आणि मध चेहऱ्यावर लावता येतात. केळी त्वचेला मऊ मुलायम करते. तसेच केळीमध्ये असलेले कॅरोटीन, व्हिटॅमिन ए आणि ई सुरकुत्या दूर करण्यासोबतच टॅनिंगपासून मुक्ती देतात. चेहऱ्यावर लावण्यासाठी, 1 केळं मॅश करा आणि त्यात 1 चमचा मध घालून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर 20 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा पाण्याने धुवा.
कोरफड जेलने मालिश करा
सुरकुत्या कमी करण्यासाठी, नियमितपणे कोरफडीच्या जेलने चेहऱ्याची मालिश करा. रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीच्या जेलने मालिश केल्याने सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तरुण दिसू लागते. कोरफडीच्या जेलमधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म मुरुमे काढून टाकण्यास मदत करते, तसेच डागांपासून आराम देखील देतात.
सुरकुत्या कमी करण्यासाठी या आयुर्वेदिक उपायांचा वापर केला जाऊ शकतो. तथापि, चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.