घरच्या घरी फेसवाॅश करताना या गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात, जाणून घ्या

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण रासायनिक स्क्रबर वापरतो. तसेच चेहरा धुण्यासाठी आपण विविध फेसवॉशचा वापर करतो. परंतु रासायनिक घटकांमुळे आपल्या त्वचेला कोरडेपणा येतो. त्यामुळे त्वचेवर कोरडेपणासोबत खाज सुटणे, पुरळ येणे आणि मुरुम येणे यासारख्या समस्या देखील कायम राहतात. अशा परिस्थितीत, वारंवार मॉइश्चरायझिंग करणे आवश्यक असते, परंतु कामामध्ये मात्र ते शक्य नसते. म्हणूनच या समस्येवर मात करण्यासाठी एक प्रभावी पर्याय म्हणजे त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करायला हवा. तुमच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, यांनी चेहरा धुतल्याने प्रथम चमक वाढते आणि दुसरे म्हणजे त्यातील ओलावा टिकून राहतो.

हिवाळ्याच्या सीझनमध्ये लालचुटूक स्ट्राॅबेरी का खायला हवी, जाणून घ्या

काकडी
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे काकडी खाण्यासोबतच ती चेहऱ्यावर लावणे हे दोन्ही फायदेशीर आहे. काकडी किसून चेहऱ्यावर घासून घ्या किंवा त्यात दही मिसळून चेहऱ्यावर लावा आणि ५ मिनिटे तसेच राहू द्या. ओलावा आणि चमक दोन्ही अबाधित राहतील.

कोरफड
कोरफडीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेची चमक वाढवण्यास मदत करतात. शिवाय, ते त्वचेला हायड्रेट ठेवते. चेहऱ्यावर वापरण्यासाठी, एका भांड्यात कोरफडीचे जेल घ्या. त्यात बेसन मिसळा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा. ते चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.

रोज रताळे का खायला हवे, जाणून घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे

बेसन
बेसन त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि त्वचेची चमक वाढवते आणि त्वचा मुलायम ठेवते. यासाठी बेसनात चिमूटभर हळद मिसळा आणि त्यात गुलाबपाणी किंवा दही घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि थोडेसे कोरडे होऊ द्या, नंतर पाण्याने धुवा.

तुळस
तुळशीचा वापर त्वचेला अनेक फायदे देतो. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, जे त्वचेशी संबंधित अनेक प्रकारचे संक्रमण दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुळशीची पाने धुवून स्वच्छ करा आणि बारीक करा. त्यात एक चमचा मध मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुमारे १५ मिनिटांनी पाण्याने धुवा.