
सीरियामध्ये अल्पसंख्याक अलावी समाजाचे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. सरकारकडून केला जाणारा भेदभाव बंद करावा, यासाठी या नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला. हे आंदोलन लताकिया, टार्टस आणि केंद्रीय शहर होम्ससह एकूण 42 ठिकाणी करण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राष्ट्रपती बशर अल असदला इस्लामी समूह ‘हयात तहरीर अल-शाम’ यांच्या नेतृत्वातील सत्ता हटवल्यानंतर देशात अनेक वेळा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. असद रशियाला पळून गेल्यानंतर त्यांच्या समाजाला लक्ष्य करण्यात आले.



























































