
कांदिवली पूर्व परिसरातील एका शाळेला अज्ञाताने ई-मेल पाठवल्याने एकच खळबळ उडाली. अज्ञाताने ई-मेल पाठवून शाळेत बॉम्बस्फोट करणार असल्याचे नमूद केले. त्या धमकीच्या ई-मेलची माहिती शाळा प्रशासनाने पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळात बॉम्ब शोधक व नाशक विभागाचे पथक घटनास्थळी आले. तपासणी केल्यावर ती अफवा असल्याचे उघड झाले. घडल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.