
गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाची 68 लाखांची फसवणूकप्रकरणी तिघांना उत्तर सायबर पोलिसांनी अटक केली. उमेश विश्वकर्मा, सचिन सावंत आणि विभान मिश्रा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्वकर्मा हा बँकेत नोकरी करतो. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
बोरिवली येथे व्यावसायिक राहतात. जानेवारी महिन्यात त्यांना ठगाने फोन करून गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवले. जास्त नफा देऊ असे सांगून त्यांना 68 लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. गुंतवणूक केलेल्या रकमेवर त्याने परतावा मागितला तेव्हा ते पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
वरिष्ठ निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे, महिला सहाय्यक निरीक्षक सविता कदम आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कांदिवली, बोरिवली आणि मीरा रोड येथून तिघांना अटक केली. उमेश हा बँक कर्मचारी आहे, तर सचिन हा कंत्राटदार आणि विभान हा सुरक्षा रक्षक आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनने स्वतःच्या नावाने आणि कुटुंबीयांच्या नावाने बनावट कंपन्या नोंद केल्या. त्या कंपन्या सायबर फसवणूक करणाऱया ठगांना विकल्या. जेव्हा त्याला नफा होत असल्याचे लक्षात आले तेव्हा त्याने त्याचे मित्र आणि परिचित असणाऱयाच्या कागदपत्रांचा वापर करून आणखी पंपन्या उघडल्या. त्या कंपन्यांच्या नावाने बँकेत खाली उघडली. उमेश आणि विभान हे दोघे ठगांच्या संपका&त होते. मनी लॉण्डरिंगचे काम त्याच्यावर सोपण्यात आले होते. या टोळीने अनेक बनावट खाती उघडल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचे इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.