
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील दलित मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दिग्विजय सिंह, विजय साहू आणि हरिराम कोरी अशी आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपी पीडितेच्या गावातील रहिवासी आहेत. आरोपी दिग्विजय हा पीडितेच्या घरी ये-जा करत असे. मात्र, पीडितेच्या भावाला ही गोष्ट खटकायची. मग एके दिवशी त्याने आरोपीला मारहाण करून घरातून हाकलून लावले. तेव्हापासून दिग्विजयच्या मनात राग होता. अपमानाचा बदला घेण्याची संधी शोधत असलेल्या आरोपीने घटनेच्या दिवशी पीडित मुलगी भागवत कथा ऐकून घरी परतत असताना तीन मित्रांच्या साथीने तिच्यावर हल्ला केला. मारहाण करून जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. पीडितेने विरोध केल्यानंतर त्यांनी तिची निर्घृण हत्या करून हात-पाय बांधून मृतदेह नाल्यात फेकून दिला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.