
पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात एक कंटेनर कारवर कोसळल्याने भीषण अपघात घडला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींना खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर नवीन बोगद्याजवळ पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. कंटनेरचा तोल गेला आणि कारवर उलटला. तर मागून वेगात येणारी अन्य वाहने एकमेकांवर आदळली. यात टाटा टियागो गाडीतील 4 जण जखमी झाले आहेत. भानुदास गायकवाड, अक्षय महाडु गायकवाड, स्वप्नील आणि नवनाथ अशी जखमींची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि हेल्प फाउंडेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली.

























































