मुंबईत वेगवेगळ्या घटनांत तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, पोलिसांकडून अटक

बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना ताजी असताना मुंबईत वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मानखुर्दमध्ये एका नातेवाईकानेच 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. गेली एक वर्ष हा नराधम या मुलीवर अत्याचार करत होता. 8 ऑगस्टला ही व्यक्ती घरात आली. मुलीची आई स्वयंपाकघरात काम करत होती. तेव्हा हा आरोपी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता, तेव्हा मुलीच्या आईने पाहिलं आणि तिने आरडाओरड केली. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत समता नगर भागात 31 वर्षीय व्यक्तीने दोन वर्षांची मुलगी आणि 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केला आहे. ही व्यक्ती सफाई कर्मचारी म्हणून काम करते आणि पीडितेच्या शेजारी राहते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.