
हिंदुस्थानी लष्कराने सिलिगुडी कॉरिडोरची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तीन नवीन सैन्य ठिकाणे बनवली आहेत. ही तीन ठिकाणे बामुनी, किशनगंड आणि चोपडामध्ये बनवण्यात आली आहेत. ही सर्व ठिकाणे बांगलादेश सीमेजवळ आणि सिलिगुडी कॉरिडोरजवळ आहेत. पाकिस्तानी जरनल साहिर शमशाद मिर्झा यांच्या बांगलादेश दौऱ्यानंतर वाढलेल्या सुरक्षा चिंतेमुळे हा निर्णय घेण्यात आला. मिर्झा हे आठ सदस्यांसोबत बांगलादेशला 24 ऑक्टोबरला पोहोचले होते. या दौऱ्यात त्यांनी बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उज-जमा यांची भेट घेतली होती.


























































