लॉस एंजेलिस पोलिस प्रशिक्षण केंद्रात मोठा स्फोट, तीन उप शेरीफ जागीच ठार

अमेरिकेतील लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या बिस्केलुझ प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी मोठा स्फोट झाला. यात स्फोटात तीन उप शेरीफ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता हा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार शेरीफचे विशेष अंमलबजावणी ब्युरो (एस.ई.बी.) काही प्रकारची स्फोटके हाताळत असताना हा अपघात झाला. ईस्टर्न अव्हेन्यूवर स्थित हे प्रशिक्षण केंद्र बॉम्ब पथक, अग्निशमन आणि स्फोट तज्ञांसारख्या लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागाच्या विशेष युनिट्सचे मुख्य केंद्र आहे.

घटनेची माहिती मिळताच लॉस एंजेलिस काउंटी अग्निशमन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने मदतकार्य सुरू केले. स्फोटात किती लोक जखमी झाले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक माध्यमांनी तीन अधिकाऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. LASD (लॉस एंजेलिस शेरीफ विभाग) ने अद्याप घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. स्फोटाबाबत तपास सुरू आहे.