
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय पिंजऱ्यामध्ये उपचार करतेवेळी टी-5 या वाघाने प्राणीरक्षकावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या रक्षकाने आपला हात झपाट्याने पिंजऱ्यातून बाहेर काढल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. 26 जून रोजी टी-5 या वाघाला उपचारासाठी वैद्यकीय पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. त्यावेळी दोन मजूर एक प्राणीरक्षक आणि पशुवैद्यकीय अधिकारी हजर होते. त्यावेळी प्राणीरक्षक राजेंद्र भोईर हे पिंजऱ्यात हात टालून वाघाच्या पाठीवर झालेल्या किरकोळ जखमेवर उपचार करत होते. वाघाने अचानक मान फिरवून भोईर यांचे बोट पकडले. भोईर यांनीदेखील तत्परतेने हात पिंजऱ्यातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.