ग्वाल्हेरमधून आनंद वार्ता… दुर्गा वाघिणीने दिला 3 बछड्यांना जन्म

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील प्राणीसंग्रहातील दुर्गा नावाच्या वाघिणीने शुक्रवारी रात्री तीन बछड्यांना जन्म दिला आहे. तीन पैकी एका बछड्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. पांढऱ्या रंगाच्या बछड्याच्या आगमनाने वन्यजीव प्रेमींना त्याची झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.

या तीन बछड्यांच्या जन्मामुळे ग्वाल्हेर प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या 9 झाली आहे. गेल्या वर्षी देखील दुर्गाने दोन बछड्यांना जन्म दिला होता. सध्या प्राणीसंग्रहालयात सहा प्रौढ वाघ असून, त्यापैकी चार नर आणि दोन मादी आहेत.

सध्या बछडे आणि मातेला वेगळे ठेवण्यात आले असून, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. यापूर्वी मीरा नावाच्या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला होता. त्यामुळे आनंदाचे वातावरण होते. या चिम