
स्पीकरला स्वच्छ करा – स्मार्टफोनचा आवाज कमी झाला असेल तर फोनच्या स्पीकरला स्वच्छ करा. फोन स्वच्छ करताना फोन स्विच ऑफ करा. फोनला हळुवारपणे स्वच्छ करा. स्वच्छ आणि मुलायम ब्रशने स्पीकरला हळुवारपणे स्वच्छ करा.
मुलायम कपड्याचा वापर करा – स्मार्टफोनला स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ आणि मुलायम कपडय़ाचा वापर करा. फोनला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. ओल्या कपडय़ाऐवजी सुकलेल्या कपडय़ाचा वापर करा. फोनला स्क्रॅच पडणार नाहीत याची काळजी घ्या. फोन स्वच्छ झाल्यानंतर पह्न स्विच ऑन करा.