
अनेकजण घरच्या घरी श्रीखंड बनवण्याचा प्रयत्न करत असतात; पण श्रीखंड कधी पातळ तर कधी खूप आंबट होते. असे होऊ नये म्हणून काही ट्रिक्स गरजेच्या आहेत. श्रीखंडाचा आंबटपणा टाळण्यासाठी ताजे, घट्ट झालेले दही वापरा.
n श्रीखंडामध्ये गुठळ्या टाळण्यासाठी त्यात पिठीसाखर चाळून टाका. चक्का खूप जास्त घट्ट झाला असेल तर तो पातळ करण्यासाठी त्यात एक चमचा दूध घाला. दही निथळण्यासाठी बाहेर टांगून ठेवल्यास आंबट होईल. ते नेहमी फ्रीजमध्ये ठेवा.


























































