
घरात झुरळे होऊ नये असे वाटत असेल तर सर्वात आधी घर नेहमी स्वच्छ ठेवा. स्वयंपाकघर आणि आजूबाजूचा परिसर नियमितपणे साफ करा. अन्न उघडे ठेवू नका आणि सांडलेले पदार्थ लगेच स्वच्छ करा. झुरळांना दमट जागा आवडतात. त्यामुळे बाथरूममधील गळतीची दुरुस्ती करा आणि पाण्याचे डबके साचू देऊ नका.
लिंबाचा रस किंवा लिंबाच्या सालीचा वापर करणेदेखील एक प्रभावी उपाय ठरू शकतो. कारण झुरळांना लिंबाचा वास अजिबात आवडत नाही. यामुळे घरात झुरळे येण्याची शक्यता कमी होते. जर झुरळांचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल, तर घरात एकदा पेस्ट पंट्रोल करून घ्या. यामुळे घरातील झुरळे कायमची जातील.


























































