।।शनिदेव प्रसन्न।।

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई 

ज्योतीष शास्त्रानुसार शनिदेवाची साडेसाती असणे फार वाईट मानले जाते. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूजा आणि उपाय केले जातात. पण शनिदेकाची पूजा करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात.

  • शनिदेवाची पूजा करताना नेहमी लोखंडी वस्तूंचा कापर केला पाहिजे. शनिदेवाची पूजा करताना तांब्याच्या भांड्यांचा वापर करू नये. तांबे हा सूर्याचा धातू मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रामध्ये शनी-सूर्य परस्परांचे शत्रू आहेत.
  • शनिदेवाची पूजा करताना निळ्या किंवा काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते. शनिदेवाची पूजा करताना कुठल्याही प्रकारे लाल रंगाचा वापर करता कामा नये. ज्योतीष शास्त्रानुसार लाल कपडे, लाल फळ किंवा लाल फुल शनिदेवाला अर्पण करू नये. कारण लाल रंग हा मंगळ ग्रहाचा आहे. हादेखील शनी ग्रहाचा शत्रू ग्रह मानला जातो.
  • शनिदेवाची पूजा करताना आपले मुख हे नेहमी पश्चिम दिशेला असायला हवे. शनिदेवाला पश्चिम दिशेचा स्वामी मानले जाते, यासाठी शनी मंत्राचा जप करताना आपले मुख त्या दिशेला ठेकल्यास लवकर शुभ फळ मिळतात.
  • शनिदेवाच्या अगदी समोरून दर्शन कधीही घेऊ नये. असे केल्यामुळे शनिदेकाची दृष्टी सरळ तुमच्यावर पडल्यामुळे तुमच्या समस्येमध्ये काढ होण्याची शक्यता असते.
  • शनिदेवाची पूजा स्वच्छपणे करावी, अस्वच्छ अवस्थेमध्ये कधीही शनिदेवाची पूजा करू नये. अस्वच्छ अवस्था म्हणजेच अंघोळ न करता, तोंड न धुता किंवा घाणेरडे कपडे परिधान करून ही पूजा करु नये.
  • शनिदेवाला काळे तीळ आणि उडीद अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे शनिदेवाला नैवेद्य दाखवताना काळे तीळ आणि उडीद यांची खिचडी बनकून द्यावी. यामुळे शनिदेक प्रसन्न होतात.