देशातील प्रतिष्ठित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या एका विद्यार्थ्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनुराग जैस्वाल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. लखनौचा रहिवासी असलेला अनुराग त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार,शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी अनुराग वाशी येथे मित्राच्या पार्टीला गेला होता. त्या पार्टीतून तो पुन्हा आपल्या भाड्याच्या घरात आला. दुसऱ्या दिवशी त्याच्या रुममधील त्याच्या काही मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्व केला. मात्र तो काही उठला नाही. त्यामुळे त्यांनी अनुरागला चेंबुरच्या एका रुग्णालात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणात रॅगिंग अँगल असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी त्यांनी अनुरागच्या तीन रूममेट्सचीही चौकशी केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून पुढील अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान पोलिसांनी अनुरागच्या कुटुंबीयांना देखील याबाबत माहिती दिली. मात्र आम्ही मुंबईत पोहोचेपर्यंत पोस्टमॉर्टम करू नये, अशी विनंती मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांना केली आहे.
अनुरागचे कुटुंब लखनौमध्ये राहते, तर तो त्याच्या शिक्षणासाठी मुंबईत तीन रूममेट्ससह भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होता.