
संशोधकांनी डिजिटल मॉडेलचा आधार घेत टायटॅनिक जहाजाच्या शेवटच्या क्षणांची पूनर्रचना केली आहे. या माहितीचा खुलासा टायटॅनिक द डिजिटल रिझरेक्शन या नॅशनल जिओग्राफिकच्या नव्या माहितीपटातून होणार आहे. टायटॅनिक बोटीने 10 एप्रिल 1912 रोजी ब्रिटन येथून न्यूयॉर्कसाठी प्रवास सुरू केला होता. प्रवासादरम्यान जहाज हिमनगाला आदळले व त्याचे दोन तुकडे होऊन ते बुडाले. या दुर्घटनेत पंधराशेहून अधिक जणांचा बळी गेला. 113 वर्षे जुन्या घटनेवर आधारित हा माहितीपट तयार करण्यात आला असून अत्याधुनिक पाणबुडी आणि स्पॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बोटीचे अचूक डिजिटल मॉडेल तयार करण्यात आले आहे. या माहितीपटात जहाजावरील शूर क्रू सदस्यांच्या शौर्यकथा दाखवण्यात आल्या आहेत.