महाकाली ढोकळा खात नाही, मतदारांना आकर्षित करण्याचा मोदींचा प्रयत्न फसलाय; महुआ मोइत्रा यांचा टोला

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगाल दौऱ्यातील भाषणावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की बंगालच्या मतदारांना आकर्षित करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न फसला आहे. आता त्यांना खूप उशीर झाला आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी बंगालमधील दुर्गापूर येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी ‘जय माँ काली, जय माँ दुर्गा’ या घोषणेसह भाषणाला सुरुवात केली. असे मानले जाते की हा बंगालच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होता. त्यावरून मोइत्रा यांनी पंतप्रधानांना जबरदस्त टोला लगावला आहे.

महुआ मोइत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी, बंगालच्या मतांसाठी माँ कालीची आठवण करायला आता खूप उशीर झाला आहे. महाकाली ढोकळा खात नाही आणि कधीही खाणार नाही’. महुआ यांनी यापूर्वीही ‘अन्न आणि संस्कृती’ या विषयावर विधान केले होते त्यांनी यापूर्वीही अन्न आणि संस्कृतीबद्दल अनेक विधाने केली आहेत. त्यांनी यापूर्वीही भाजपवर ‘अन्नाची संस्कृती लादण्याचा’ आरोप केला आहे.

2021 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने मोठ्या बहुमताने निवडणूक जिंकली. त्याच वेळी, भाजप 77 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आला. बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचा एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत जिंकू शकला नाही.