डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, सकाळी दहा मिनिटे ही गोष्ट करायला हवी, वाचा

हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात, त्यामुळे गवतावर चालण्याचे अगणित फायदे होतात. खासकरुन हिरवळीवर चालण्यामुळे आपल्या पायाच्या नसांना आराम मिळतो. तसेच मुख्यत्वे दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळचा व्यायाम किंवा मॉर्निंग वाॅक करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. मात्र चालण्याचा हा व्यायाम हिरवळीवर केल्यास तुमच्या आरोग्यास आणि विशेषतः डोळ्यांसाठी फारच फायदेशीर  ठरतो. मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच आरोग्यदायी  कारणांसाठी नक्की सकाळी हिरवळीवर चाला.

वय वाढताना मेकअप करताना या टिप्स समोर ठेवायला हव्यात, वाचा

हिरवळीचा हिरवा रंग शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. पायाच्या तळव्यावरील बिंदूवर प्रेशर येणे हे आपल्या शरीरासाठी उत्तम असते. तळव्यावर पडलेल्या प्रेशरमुळे शरीरास खूप चांगले लाभ मिळतात. विशेषतः डोळे, कान, फुफ्फुस, चेहरा, पोट, मेंदू, किडनी यांचे काही पाॅईटस् हे तळव्यामध्ये असतात. त्यामुळे हिरवळीवरून चालताना या अवयवांसाठी फायदेशीर ठरते.

उत्तम आरोग्यासाठी ग्रीन टीचा पर्याय निवडणे योग्य आहे का, वाचा

ताजी हवा, कोवळे ऊन आणि शांत वातावरण सकाळी असते, म्हणूनच ही वेळ व्यायामासाठी अतिशय उत्तम मानली जाते. ताज्या हवेतील ऑक्सिजन मुळे आपले स्वास्थ्य सुधारते. कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरास मिळते. तसेच सकाळच्या शांत वातावरणामुळे रिलॅक्स राहायलाही मदत मिळते. परिणामी निरोगी स्वास्थ्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो. सकाळी हिरवळीवर चालण्यामुळे शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत होते. आपण चालताना शरीराचा सारा भार आपल्या पायांवर असतो. विशेषतः पहिल्या बोटावर !डोळ्यांचे आरोग्य सुधारणारे  रिफ्रॅक्सोलॉजी प्रेशर पॉईंटस दुसर्‍या आणि तिसर्‍या बोटामध्ये असते. त्यामुळे हिरवळीवर चालण्याचा सर्वाधिक फायदा डोळ्यांसाठी होतो.

कडधान्य खाण्याचे अगणित फायदे काय होतात, वाचा सविस्तर

नॅचरोपॅथी ही उपचारपद्धती निसर्गातील पंचभूतांशी निगडीत असते, त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी.  त्यातून येणार्‍या मॅगनेटीक लहरींमध्ये आरोग्यासाठी गुणकारी अशी उर्जा सामावलेली असते. त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. पृथ्वी आणि या मॅगनेटीक लहरींच्या एकत्र येण्यामुळे शरीरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. परिणामी त्यातून उद्भवणारे आजार रोखण्यासही मदत होते. सकाळी अनवाणी गवतावर चालण्याचे शरीरासाठी इतके सारे फायदे आहेत. त्यामुळे आजपासून किमान १० मिनिटे तुम्ही अनवाणी चालण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून तुमचे आरोग्यही उत्तम सुधारेल.