
‘मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’ मार्गिकांवरील प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलकडून वेळोवेळी आवश्यक ते बदल वा नवीन सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागू नये याकरिता व्हॉटस्अॅप तिकीट सेवेसह विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. आता प्रवाशांना मेट्रो प्रवासादरम्यान स्वच्छ, चकाचक प्रसाधनगृह उपलब्ध करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. एमएमएमओसीएलकडून ‘टॉयलेटसेवा’ नावाने एक अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे.