Tokyo Olympic- आणखी एक पदक निश्चित, कुस्तीपटू रवी दहिया अंतिम फेरीत

कुस्तीपटू रवी दहियाने हिंदुस्थानसाठी आणखी एक पदक निश्चित केलं आहे. आज झालेल्या कुस्तीच्या मुकाबल्यात रवी दहिया याने सनायेव नुरीस्लाम या कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देत अंतिम फेरीत धडक मारली आहे. बुधवारी 57 किलो वजनी गटासाठीचा सामना होता ज्यात रवी दहियाने विजय मिळवला आहे. रवी दहिया अंतिम फेरीत विजयी झाल्यास त्याला सुवर्ण पदक मिळणार आहे. हिंदुस्थानने या स्पर्धेत आतापर्यंत 3 पदके कमावली असून रवी दहियामुळे चौथे पदक निश्चित झाले आहे.

रवी दहियाने यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात बल्गेरियाच्या जॉर्जी वलेंतिनोव्हला 14-4 असं पराभूत केलं होतं. जॉर्जीला हरवत रवीने उपांत्य फेरीत दिमाखआत प्रवेश केला होता. सनायेवने उपांत्य फेरीतील सामन्यात सुरूवातीला मोठी आघाडी घेतली होती. पिछाडीवर पडलेल्या रवीने यानंतर दमदार खेळ करत प्रतिस्पर्ध्याला एकही संधी न देता आपला विजय निश्चित केला.

लव्हलिना बोर्गोहेनचा विजयी पंच

बुधवारी सकाळी हिंदुस्थानची महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने हिंदुस्थानची पदकांची संख्या 3 वर नेली होती. लव्हलिनाने टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. मला सुवर्ण पदक जिंकायचेय, असा निर्धार लव्हलिना बोर्गोहेनने बोलून दाखविलेला होता. मात्री बुधवारी उपांत्य फेरीत तिच्यापुढे विद्यमान जगज्जेती असललेल्या तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेली हिचे आव्हान होतं. बुसेनाज सुरमेनेलीला लव्हलिनाने कडवट झुंज दिली, मात्र तिचे प्रयत्न तोकडे पडले.

आपली प्रतिक्रिया द्या