ऑलिम्पिक पात्रता फेरी, मनप्रीत, रानीकडे हॉकी संघाचे नेतृत्व

383

पुढल्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक करण्यासाठी अखेरची संधी असलेल्या हिंदुस्थानी हॉकी संघांतील खेळाडूंची निवड शुक्रवारी हॉकी इंडियाकडून करण्यात आली. मनप्रीत सिंगकडे पुरुषांच्या तर रानीकडे महिलांच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. एस. व्ही. सुनील संघाचा उपकर्णधार असून सवीता महिला संघाची उपकर्णधार आहे.

ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या लढती एक व दोन नोव्हेंबरला भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये रंगणार आहे. पुरुषांच्या गटात पाचव्या रँकिंगवरील हिंदुस्थानच्या संघासमोर 22व्या रँकिंगवरील रशियाचे, तर महिलांच्या गटात नवव्या रँकिंगवरील हिंदुस्थानच्या संघासमोर 13व्या रँकिंगवरील अमेरिकेचे आव्हान असणार आहे.

हिंदुस्थानी पुरुषांचा हॉकी संघ

पीआर श्रीजेश, कृष्णन पाठक, हरमनप्रीत सिंग, वरूणकुमार, सुरेंदरकुमार, गुरींदर सिंग, रूपिंदरपाल सिंग, अमित रोहीदास, मनप्रीत सिंग (कर्णधार), नीलकांता शर्मा, हार्दीक सिंग, विवेकसागर प्रसाद, ललीतकुमार उपाध्याय, एस व्ही सुनील (उपकर्णधार), मनदीप सिंग,आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, सिमरनजीत सिंग.

हिंदुस्थानी महिलांचा हॉकी संघ

सवीता (उपकर्णधार), रजनी इतिमारपू, दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, रीना खोकर, सलीमा टेटे, सुशीला चानू, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लीलिमा मिन्झ, नमीता टोप्पो, रानी (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेयसियामी, नवज्योत कौर, शर्मिला देवी.

आपली प्रतिक्रिया द्या