
मुंबईसह ठाण्याला पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून वाहतूक ठप्प झाली आहे. अशातच घोडबंदर रोड वरून मीरा भाईंदरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, या मार्गावरून प्रवास न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करून पोलिसांनी म्हटले आहे की, ठाणे घोडबंदर वाहिनीवर सध्या चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडबंदर रोडवरील पातलीपाडा, मानपाडा ब्रिज खाली, चितळसर पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक जाम आहे आणि वाहनं संथ गतीने जात आहेत. मीरा-भाईंदर हद्दीमध्ये वर्सोवा, काजू पाडा आणि चेना गाव या ठिकाणी 4 फुटांपेक्षा जास्त पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद आहे. त्यामुळे घोडबंदर रोड वरून मीरा-भाईंदर कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबलेली आहे. कृपया कोणीही या मार्गाचा वापर करू नये, अन्यथा आपण मोठ्या ट्रॅफिक जाम मध्ये फसू शकता
तरी घोडबंदर परिसरात राहणारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की घोडबंदर मार्गावरून प्रवास करीत असताना पर्यायी मार्गाचा म्हणजेच ठाणे कडून घोडबंदर कडे जाताना पोखरण रोड नंबर दोन मार्ग, ग्लॅडियस अवरनेस रोड, मुल्लाबाग या मार्गाचा वापर करावा
तसेच घोडबंदरहून ठाणे कडे जाताना आनंदनगर, वाघबीळ, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड कोलशेत या मार्गाचा वापर करावा. अत्यावश्यक गरज असेल तरच घोडबंदर मार्गाचा वापर करावा. तसेच कोणीही रॉग साईडचा वापर करू नये व विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करू नये.कृपया वाहतूक पोलिसांच्या सूचनेचे पालन करावे व सहकार्य करावे असा आवाहन पोलिसांनी केले आहे.
ठाणे, घोडबंदर वाहिनी वरून प्रवास करणाऱ्या नागरिकांकरिता महत्वाच्या सूचना… pic.twitter.com/PTA89YuzvT
— Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे (@ThaneCityPolice) August 19, 2025