टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच ट्रायने फसवे कॉल आणि मेसेजला आळा घालण्यासाठी पावले उचलली आहेत. ट्रायच्या नव्या नियमातंर्गत 50पेक्षा जास्त कॉल आणि मेसेज जर एखाद्या सिम कार्डवरून केले तर त्याची चौकशी होईल. कारण असे कॉल किंवा मेसेज म्हणजे टेलिमार्केटिंगचा प्रकार असू शकतो. त्यासाठी 10 डिजिट मोबाईल नंबरचा वापर करून लोकांना कॉल किंवा मेसेज करून त्रास दिला जातो. अशा सिम कार्डचा शोध घेऊन ते ब्लॉक करण्याचे ट्रायने ठरवले आहे.
जानेवारी-मार्च 2024 दरम्यान ज्या 14 लाख मोबाईलवरून दिवसाला 50 ते एक हजार कॉल करण्यात आले आहेत त्यांचा शोध घेण्यात आला आहे. 4 लाख सिम कार्ड्स असे आहेत ज्याचा वापर करून दिवसाला 50पेक्षा अधिक मेसेज पाठवण्यात आले आहेत.