केंद्राच्या निकषानुसार ट्रॉमा केअर सेंटरना मंजुरी,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

केंद्र सरकारचे निकष आणि राज्यात गठीत केलेल्या समितीच्या शिफारशी या धोरणानुसार राज्यातील आवश्यकता असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण केले जातील. भविष्यात अशा सेंटरना या धोरणानुसारच मंजुरी दिली जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितले. शेखर निकम यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सुनील प्रभू, संजय सावकारे, अमित झनक, भास्करराव जाधव यांनी भाग घेतला.

माणगावला ट्रॉमा केअरसाठी विनंती

मुंबई-गोवा महामार्गाचे सहापदरी रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गावर रायगड जिह्यातील माणगाव हा परिसर अपघातप्रवण क्षेत्रात मोडतो. या ठिकाणी अपघात झाल्यास वेळेत उपचार मिळत नाहीत. हे लक्षात घेता या महामार्गावर माणगाव येथे ट्रॉमा केअर पद्धतीचे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या