
वडिलांच्या प्रेमाला, समर्पणाला आणि त्यागाला मर्यादा नसतात याचे दर्शन घडवणारा छत्तीसगडच्या जशपूर जिह्यातील व्हिडीओ व्हायरल होतोय. बजरंग राम भगत या शेतकऱयाने लेकीला स्कूटर भेट म्हणून देण्यासाठी जिवाचे रान केले आहे. शेतकऱयाने सहा महिन्यांत 40 हजार रुपयांची नाणी जमा करून ठेवली. मग सहा महिन्यांनंतर तीच नाणी घेऊन आपल्या लेकीला स्कूटर घेऊन देण्यासाठी शो रूममध्ये गेला. शोरूमच्या कर्मचाऱयांनी नाणी टेबलावर ठेवून ती मोजण्यास सुरुवात केली. शोरूमच्या टेबलवर नाण्यांच्या ढिग दिसतोय. नाणी मोजून झाल्यावर वडील गाडी खरेदी करतात आणि मुलगी आनंदाने टाळ्या वाजवताना दिसते आहे. हा व्हिडीओ @vishnukant_7 या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.































































