कोपरगावातील बुब रूग्णालयात जन्‍मले तिळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव शहरातील डॉ. पंकज बुब यांच्‍या बुब रूग्णालयामध्ये शुक्रवारी एका महिलेने तीळ्यांना जन्म दिला. तीन मुलांपैकी दोन मुले तर एक मुलगी आहे. अनिता प्रदीप पाटील असे या या तीळ्यांना जन्म देणाऱ्या मातेचे नाव असून, मातेसह तिनही नवजात बालकांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे रुग्णालयात आनंदाचे वातावरण आहे.

राहता तालुक्‍यातील निघोज निमगाव येथील अनिता प्रदीप पाटील या महिलेला प्रसूतीसाठी गुरूवारी सायंकाळी कोपरगावच्या बुब रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी तिला प्रसुती वेदना होऊ लागल्‍याने, मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला तत्काळ शस्त्रक्रिया विभागात दाखल करून तिची प्रसूती करण्यात आली. सध्या तिनही बालकांसह मातेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ.पंकतज बुब यांनी सांगितले. या वेळी डॉ.पंकज आणि डॉ आभा या डॉक्टर दाम्पत्यासह,बालरोग तज्ज्ञ डॉ. अशिष काळे यांच्यासह परिचारीकांनी परिश्रम घेतले.