घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? मग करुन बघा हे साधे सोपे उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळा सुरू होताच अनेकांना शरीरातून येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीची समस्या त्रास देऊ लागते. घाम स्वतः दुर्गंधीयुक्त नसतो; मात्र त्वचेवर असलेल्या जीवाणूंशी त्याचा संपर्क आला की वास निर्माण होतो. योग्य स्वच्छता आणि काही साधे घरगुती उपाय केल्यास ही समस्या सहज नियंत्रणात ठेवता येते. घाम शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी येतो. पण जेव्हा त्वचेवर घाम जास्त वेळ राहतो तेव्हा जीवाणू वाढतात आणि त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. जास्त घाम येणे, अस्वच्छता, काही अन्नपदार्थ किंवा हार्मोनल बदल यामुळेही ही समस्या वाढू शकते.

घामाची दुर्गंधी टाळण्यासाठी सोपे उपाय

दररोज किमान एकदा साबणाने आंघोळ केल्याने त्वचेवरील जीवाणू कमी होतात. उन्हाळ्यात शक्य असल्यास दिवसातून दोनदा आंघोळ करणे फायदेशीर ठरते.

कॉटनचे सैल कपडे वापरल्यास घाम पटकन सुकतो आणि दुर्गंधी कमी होते. घाम झाल्यानंतर ओले कपडे जास्त वेळ घालणे टाळा.

लिंबाचा रस काखेतील भागावर लावल्यास जीवाणू कमी होतात. तसेच थोडा बेकिंग सोडा लावल्यासही घामाची दुर्गंधी कमी होते.

खूप मसालेदार, लसूण-कांदा किंवा जंक फूड जास्त खाल्ल्यास शरीराचा वास वाढू शकतो. त्यामुळे फळे, भाज्या आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

जर स्वच्छता ठेवूनही घामाची दुर्गंधी खूपच तीव्र असेल किंवा खूप जास्त घाम येत असेल, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते. थोडी स्वच्छता, योग्य आहार आणि साधे उपाय अवलंबल्यास घामाच्या दुर्गंधीपासून सहज सुटका मिळू शकते आणि दिवसभर ताजेतवाने राहता येते. घामाच्या दुर्घंधीपासून दूर राहण्यासाठी आपण अनेक उपाय करणे हे खूप गरजेचे आहेत. याकरता साध्या सोप्या उपायंनी आपण त्यावर मात करु शकतो.