
‘बिग ब्युटिफुल’ बिलावरून झालेल्या वादानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अब्जाधीश एलॉन मस्क यांच्याशी मांडवलीचे संकेत दिले आहेत. मी मस्क यांच्या कंपन्यांची सबसिडी बंद करून त्यांना बरबाद करणार असल्याची चर्चा चुकीची आहे. तसा माझा कुठलाही विचार नाही. एलॉन मला हवा आहे,’ असे ट्रम्प यांनी आज स्पष्ट केले.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत एकमेकांचे मित्र असलेल्या एलॉन मस्क व ट्रम्प यांच्यात बिग ब्युटिफुल बिलावरून वितुष्ट आले. त्यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे हा वाद वाढणार असे वाटत होते, मात्र ट्रम्प यांनी तडजोडीचे संकेत दिले आहेत.
‘मला एलॉन मस्क हवा आहे. त्याच्यासारखे इतर सर्व उद्योजक मला अमेरिकेत हवे आहेत. या सर्वांनी कधी नव्हे इतकी प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे.’