ग्रीनलँड अमेरिकेचेच ट्रम्प यांच्या पोस्टने खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या अकाऊंटवर अमेरिकेचा नवा नकाशा शेअर केला. त्यात ग्रीनलँडसह व्हेनेझुएला व कॅनडाला अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये ग्रीनलँडवर अमेरिकेचा ध्वज फडकवतानाचा स्वतःचा फोटो ट्रम्प यांनी शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यास युरोपीयन युनियनसह अन्य देशांनी विरोध दर्शवला आहे.