हे करून पहा, दुखापतीनंतर रक्त थांबत नसेल तर…

आपल्याला काही काम करताना छोटी-मोठी दुखापत होऊ शकते. जखम जर छोटी असेल तर ती काही दिवसांत भरून येते. डॉक्टरकडे जाईपर्यंत आपण काही घरगुती उपचार करून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करतो.

  • रक्तस्राव झालेल्या जागेवर स्वच्छ सुती कापड ठेवून दोन्ही हातांनी दाब द्यावा. रक्तस्राव थांबेपर्यंत हळूहळू हातांनी दाब देत रहा. साधारण 5 ते 10 मिनिटांनी रक्तस्राव थांबेल.
  • शरीरातील कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव थांबवण्यासाठी दुखापतीवर कोरफड जेल पिंवा बँडेजवर किंवा सुती पट्टीवर पेट्रोलियम जेली लावू शकतो.
  • शरीराच्या ज्या भागाला दुखापत झाली असेल तो भाग वर उचलून धरावा. असे केल्याने रक्तस्राव लगेच रोखला जातो.