कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी हे करून पहा

  • कोथिंबीर वडी कुरकुरीत बनवायची असेल तर त्यासाठी सोप्या टिप्स आहेत. सर्वात आधी कोथिंबीर जुडी, बेसन, तांदळाचे पीठ आणि आले, लसूण, हिरव्या मिरच्या यांची पेस्ट व जिरे, धणे पावडर, हळद, तिखट, मीठ, हिंग घ्या. एका मोठ्या भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन आणि तांदळाचे पीठ घ्या. सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्या.
  • मिश्रण खूप पातळ नसावे. तयार मिश्रणाचा एकसारखा थर एका ताटलीत पसरवा आणि वाफेवर शिजवून घ्या. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर त्याचे चौकोनी किंवा डायमंड आकारात तुकडे करा. एका कढईत तेल गरम करा आणि वड्या सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम वडी टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत मनसोक्त खा.