एसी लोकलमध्ये TTE ला मारहाण, त्या तरुणांचं पुढे काय झालं?

एसी लोकलमध्ये तीन प्रवाशांनी मिळून एका TTEला जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर रेल्वे पोलिसांनी या तीनही तरुणांना ताब्यात घेतलं. पण ज्या TTEला मारहाण झाली, त्यांनी या तरुणांना माफ केलं. गुन्हा दाखल झाला तर त्यांची नोकरी जाईल त्यामुळे या TTE ने त्यांना माफ केले आहे.

शुक्रवारी अनिकेत भोसले हा तरुण चर्चगेट-विरार या एसी लोकलमधून प्रवास करत होता. तेव्हा TTE जसबीर सिंह यांनी अनिकेतकडे तिकीट मागितलं. अनिकेतकडे एसी लोकलचं वैध तिकीट नव्हतं. तेव्हा सिंह यांनी अनिकेतकडे दंडाचे पैसे मागितले. अनिकेतने दंड देण्यास नकार दिला. दरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि अनिकेतने सिंह यांना मारहाण करायला सुरुवात केली. अनिकेतच्या दोन मित्रांनीही सिहं यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. बोरिवली स्थानकात रेल्वे पोलिसांनी अनिकेत आणि त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतलं. तसेच अनिकेतकडून माफीनामा घेतला.

सिंह यांनी केले माफ

अनिकेतने माफीनामा दिल्यानंतर सिंह यांनी मोठ्या मनाने माफ केलं. जर अनिकेतवर गुन्हा दाखल झाला असता तर कदाचित त्याला नोकरी गमवावी लागली असती. त्यामुळे सिंह यांनी अनिकेतला माफ केले.