तुर्कीचा धडका, खरेदी करणार 40 युरोफायटर

turkey-acquires-40-eurofighter-typhoon-jets-from-germany-uk

जागतिक पातळीवरील वाढत्या तणावामुळे प्रत्येक देश सावध झाला असून संरक्षणसज्जता वाढवत आहे. अत्याधुनिक ड्रोनसह सज्ज झालेल्या तुर्कीने आता 40 युरोफायटर टायफून जेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनी आणि ब्रिटनकडून तुर्की ही विमाने खरेदी करणार आहे.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी देशाच्या हवाई दलाला जागतिक दर्जाचे बनविण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच भाग म्हणून तुर्कीने विमान खरेदीसाठी ब्रिटन आणि जर्मनी यांच्याशी करार केला आहे. हा संपूर्ण करार 5.6 अब्ज डॉलर्सचा असल्याचे सांगितले जाते. युरोफायटर जेट हे अति अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. याची तुलना फ्रान्सच्या राफेल आणि अमेरिकेच्या एफ-16 विमानांशी केली जाते.