उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे अभिनेत्याकडून तोंडभरून कौतुक

3253

महाराष्ट्रामध्ये भाजपचे राज्य येऊ न दिल्याबद्दल अभिनेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ट्विटरवरून व्यक्त होताना या अभिनेत्याने पवारांना ‘लोहपुरुष’ ही उपमा दिली आहे.

अभिनेता आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की ‘भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यापासून रोखल्याबद्दल दिग्गज नेते, हिंदुस्थानी राजकारणातील खरे ‘चाणक्य’ शरद पवार यांचे मनापासून आभार. त्यांनी महाराष्ट्राला उत्तर प्रदेश आणि कश्मीरप्रमाणे मृत्यूचे मैदान बनवण्यापासून वाचवले’

शत्रुघ्न सिन्हा यांनी आणखी एक ट्विट करताना म्हटलंय की ‘शरद पवार यांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना सक्रीय पाठिंबा दिला. या दोघांना काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाणांची साथ लाभली.’

शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय की ‘CAA मुळे महाराष्ट्रात इंटरनेट बंद झाल्याने शिक्षण, व्यापार आणि आरोग्य सुविधांवर परिणाम झाला असता. मात्र असं न होता शिवसेना आणि काँग्रेस आघाडी सरकारमुळे लोकशाही तत्वावर चालणारा महाराष्ट्र सुरक्षित आहे. जय महाराष्ट्र!’

एकेकाळी शत्रुघ्न सिन्हा हे भाजपमध्ये होते आणि त्यांनी खासदारकीची निवडणुकही जिंकली होती. मात्र त्यांचे पक्षातील नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित यांचा विरोध केला होता. कालांतराने त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना भाजपच्या रविशंकर प्रसाद यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

आपली प्रतिक्रिया द्या