
इंग्लंडच्या केंटमधील कॅन्टरबरी येथे मेंदुज्वराचा प्रादुर्भाव झाला आहे. मेंदुज्वरामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य 11 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संसर्गाचा संबंध शहरातील ‘क्लब केमिस्ट्री’ या नाईट क्लबशी जोडला जात आहे. ज्यांनी 5 ते 7 मार्च रोजी या क्लबला भेट दिली असेल त्यांनी प्रतिबंधात्मक उपचारांसाठी तातडीने पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. बाधित रुग्णांमध्ये 18 ते 21 वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने आतापर्यंत 30 हजाराहून अधिक जणांशी संपर्क साधला आहे.
























































