रशियातील युद्धात दोन हिंदुस्थानी तरुणांचा मृत्यू

रशियाच्या लष्करामध्ये भरती झालेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. रशिया आणि युव्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हिंदुस्थानात नोकरी नसल्याने हिंदुस्थानातील अनेक जण रशियात नोकरीसाठी गेले आहेत. रशियाच्या लष्करात भरती झालेल्या या तरुणांचा मात्र अवघ्या दोन महिन्यांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली आहे. रशियाच्या लष्करामध्ये भरती झालेल्या दोन हिंदुस्थानी तरुणांचा मृत्यू झाला आहे, हे सांगताना आम्हाला खूप दुःख होत आहे. मृतांच्या कुटुंबीयांबाबत आम्ही संवेदना व्यक्त करतो. आम्ही मॉस्को राजदूताशी संपर्क केला आहे. या तरुणांचे पार्थिव लवकरात लवकर हिंदुस्थानात आणण्याची मागणी केली आहे, असे हिंदुस्थानी परराष्ट्र खात्याने सांगितले. हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. रशियामधील कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी अर्ज करताना खबरदारी घेण्याचे आवाहन यातून केले आहे. हिंदुस्थानात नोकरी मिळत नसल्याने, तसेच रशियात भरमसाट पगार मिळत असल्याने अनेक जण रशियात नोकरीसाठी गेले आहेत.