रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी दोघांना अटक 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या दोघांना दक्षिण सायबर पोलिसांनी बेडया ठोकल्या. त्या दोघांना अटक करून आज गिरगाव येथील न्यायालयात हजर केले होते.  राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवर वारंवार आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. त्याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली. महिला आयोगाने त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती.