टिपू सुलतानच्या पिस्तुलांचा लिलाव

मैसूरचा राजा टिपू सुलतानच्या दोन पिस्तुलांचा लंडनमध्ये नुकताच लिलाव झाला. टिपू सुलतानची चांदीजडित फ्लिंटलॉक पिस्तुलांची जोडी 11 लाख पाऊंडमध्ये म्हणजे साधारण 12 कोटी 83 लाख रुपयांना एका खासगी संग्राहकाने खरेदी केली. ही किंमत अंदाजित किमतीपेक्षा साधारण 14 पट अधिक आहे. या पिस्तुलांचा वापर टिपू सुलतानने इंग्रजांविरोधातील लढाईत केला होता. 1799 साली ईस्ट इंडिया कंपनीने श्रीरंगपट्टनमला घेराव घातला होता. त्या वेळी ब्रिटिशांना टिपू सुलतानच्या खजिन्यात या पिस्तुली सापडल्या होत्या. या हल्ल्यात टिपू सुलतानचा मृत्यू झाला. त्यानंतर ब्रिटिश बहुमूल्य शस्त्रे घेऊन ब्रिटनला गेले.