जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी तलावात बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । जिंतूर

जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारात असलेल्या तलावात पोहोण्याकरिता गेलेल्या २ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली.

जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी येथे इयत्ता तिसरी वर्गात शिक्षण ग्रहण करणारा 8 वर्षीय करण सुभाष निकाळजे व मामाच्या गावी सुट्ट्यांमध्ये आलेला मंठा येथील 14 वर्षीय पवन दिलीप आढे हे 2 विद्यार्थी कुऱ्हाडी शिवारातील तलावात पोहण्याकरिता गेले होते. मात्र पोहतांना दोघांचे पाय गाळात अडकल्याने दोघांचाही पाण्यात बुडून अंत झाला. सदरील घटना शेळी पालन करणाऱ्या मुलीने पाहील्यानंतर ग्रामस्थांना सांगितल्यानंतर नारायण इंझे, राम काजळे, दामोदर घुगे, लक्ष्मण काजळे, केशव इंझे, केशव इंझे आदींनी दोघांचे प्रेत बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच बामणी पोलीस ठाण्याचे फौजदार पल्लेवाड, जमादार मेकेवाड यांनी घटनेचा पंचनामा केला.