24 लाखांच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक

तब्बल 24 लाखांचे दागिने चोरून पळून गेलेल्या दोन नोकरांना मालाड पोलिसांनी अटक केली. बुधो शेख असे त्याचे नाव आहे. तक्रारदार हे व्यावसायिक असून ते मालाड येथे राहतात. त्यांचा दागिने बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे बुधो हा एप्रिलपासून कामाला होता. ऑक्टोबर महिन्यात तो नेहमीप्रमाणे कामाला आला. त्यानंतर तो अचानक कामावर येणे बंद झाला. तक्रारदार याने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. तेव्हा त्याचा फोन बंद येत होता. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने दागिन्यांचे ऑडिट केले. तेव्हा 24 लाख 50 हजार रुपयांचे दागिने कमी दिसले.

घडल्या प्रकरणी त्याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. शेखच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधोला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने दागिनेचोरीची कबुली दिली. बुधोला अटक करून न्यायालयात हजर केले होते.